आदर्श विद्या निकेतन शाळा, काशिगाव, मिरारोड (Adarsh Vidya Niketan School, Kashigaon, Mira Road)
यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.
शाळेविषयी माहिती :
श्री शिवशक्ती सेवा मंडळ काशीगांव या संस्थेची स्थापना सन 1984 साली झाली. संस्थेची ध्येय- धोरणे हि मुळातच समाजसेवा, शिक्षण ,आरोग्य हे घटक समोर ठेवून निश्चित करण्यात आली. संस्था सुरु झाल्यानंतर अनेक आरोग्य शिबीरे, वृक्षारोपण, सार्वजनिक विवाह सोहळे, सार्वजनिक गणेशोत्सव, गोपाळकाला, विविध क्रीडा स्पर्धा, गुणवंत गौरव सोहळा अशी अनेक सामाजिक कार्ये संस्थेने आयोजीत केली. हे करीत असतानाच जवळपासच्या परिसरात माध्यमिक शाळा नाही तसेच चेना, काजूपाडा या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांचाही नेटाने विचार करीत शाळा सुरू करण्याचा विचार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. केसरीनाथ डोंगरनाथ म्हात्रे यांनी केला. मनपा शाळेचे माजी मुख्याध्यापक ,आणि संस्थेचे उपाध्यक्ष स्व. बांदवडकर गुरुजी व संस्थेच्या सचिव सौ.स्वाती जोशी यांच्या सहकार्याने शाळेचा श्री गणेशा झाला.
“आदर्श विद्या निकेतन” या शाळेच्या स्थापनेने पदाधिकाऱ्यांनी पाहिलेल्या स्वप्नाला मूर्त स्वरूप आले. श्री शिवशक्ती सेवा मंडळाच्या माध्यमातून आदर्श विद्या निकेतन या शाळेचा प्रस्ताव सन 1997-98 मध्ये शासनाकडे सादर झाला. व सन 1999 साली शाळेला मान्यता मिळाली. त्यानुसार शाळेचे वर्ग बालवाडी, इयत्ता 1 ली ते 4 थी व इयत्ता 8 वी पासूनचे वर्ग सुरु करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2000-2001 पासून शाळेला नैसर्गिक वाढीने इयत्ता 10 वि च्या वर्गास परवानगी मिळून इंडेक्स नंबर प्राप्त झाला. अवघ्या काही विदयार्थ्यांसह 25 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या विद्यालयात आज दीड हजाराहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयातील अनेक गुणवंत शिक्षकांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आधुनिक प्रसार माध्यमातूनही आमच्या विद्यालयातील शिक्षक विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अनेक नामवंत माजी विदयार्थ्यांची परंपरा विद्यालयाला लाभली आहे.
शाळेची ध्येय आणि धोरणे :
- गुणवत्तापूर्ण शिक्षण : विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणे.
- व्यक्तिमत्व विकास : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे.
- नैतिक मूल्ये : नैतिक मूल्ये आणि सद्गुणांचे शिक्षण देणे.
- स्वावलंबन : विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे.
- सामाजिक जबाबदारी : समाजातील जबाबदारीची जाणीव करुन देणे.
- सर्जनशीलता : विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कल्पकता वाढविणे.
- शारीरिक स्वास्थ्य : शारीरिक आरोग्याची काळजी घेणे.
- सांस्कृतिक जाणीव : विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाची माहिती देणे.
जेणेकरून, एक मजबूत, सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षण प्रणाली तयार करून समाजातील सर्व, अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करण्यास सक्षम बनविणे. विद्यार्थ्यांमधून स्वतंत्र, यशस्वी आणि जबाबदार भारताचे सुजाण नागरिक तयार करणे हे आमचे ध्येय आहे,
शाळेची उद्दिष्टे :
- विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे.
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करणे, ज्यामध्ये नैतिकता, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव वाढवली जाते.
- विद्यार्थ्यांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाची सुविधा पुरवणे.
- विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे.
- तांत्रिक आणि डिजिटल कौशल्यांचा विकास करणे. जेणेकरून विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात सहजपणे ज्ञान आत्मसात करू शकतील.
- विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता आणि नवोन्मेषी विचारांची वाढ करणे.
- विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जागरूक करणे आणि त्याच्या संवर्धनासाठी प्रेरित करणे.
- विद्यार्थ्यांना विविध संस्कृतींविषयी आदर आणि समज वाढवणे.
शाळेची वैशिष्ट्ये :
गुणवत्तापूर्ण शिक्षण
प्रशिक्षित शिक्षक
सुविधायुक्त वातावरण
विद्यार्थी-केंद्रित अभ्यासक्रम
सुरक्षितता
गुणवत्तापूर्ण शिक्षण
सर्वांगीण विकास
स्मार्ट शिक्षण
अभ्यासाबाहेरील उपक्रम
पालक-शाळा सहचर्य
विविध क्षेत्रभेटी
हंगामी क्रिडा स्पर्धा
अवांतर वाचन आणि साहित्य
शैक्षणिक सहल
कलागौरव उत्सव
शाळेला प्राप्त पुरस्कार :
आदर्श शाळा पुरस्कार
८ मार्च २०१९
जिल्ह्यातील चार आदर्श शाळांपैकी एक आदर्श शाळा म्हणून आंतरराष्ट्रीय शाळा बहुमान.
राज्यस्तरीय सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार
३१ मार्च २०१९
राज्यस्तरीय सर्वांग सुंदर शाळा राज्य पुरस्कार.
कृतिशील शाळा पुरस्कार
५ सप्टेंबर २०१९
मा.राज्यमंत्री रणजित पाटील यांचे हस्ते कृतिशील शाळा पुरस्कार.
"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" तालुकास्तरीय प्रथम शाळा बहुमान
फेब्रुवारी २०२४
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” तालुकास्तरीय प्रथम शाळा बहुमान
"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" जिल्हास्तरीय प्रथम शाळा बहुमान
फेब्रुवारी २०२४
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” जिल्हास्तरीय प्रथम शाळा बहुमान
मातृभाषेतील शिक्षण हेच खरे शिक्षण.
शिक्षणात मातृभाषेमुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. मातृभाषा ही संस्काराचा आणि संस्कृतीचा मानबिंदू आहे. जितक्या सहजतेने मूल मातृभाषेतून शिकते तितक्या सहजतेने इंग्रजीतून शिकत नाही म्हणून मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण आहे.
इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, चीन, जपान, रशिया यासारख्या प्रगत देशातही मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. या देशातील पालक जाणीवपूर्वक आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देतात. फिनलँड सारखा देश की ज्या देशाच्या शिक्षण पद्धतीचे अनुकरण प्रगत राष्ट्रही करतात त्या देशातही मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर मुलांना इंग्रजीचे डोस पाजले तर इथला मराठी भाषेचा समृद्ध ठेवा लुप्त होईल. मुलांमध्ये, राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मता, चांगल्या संस्काराचे रोपण करायला मातृभाषाच कामी येईल.
“मराठी माध्यमातील शाळांमध्ये स्थानिक संस्कृती, भाषा आणि साहित्याचा महत्त्वपूर्ण अभ्यास मिळतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक परिपेक्षितता वाढते.”
